पंढरीये पांडुरंग । भ
421.
पंढरीये पांडुरंग । भोवंता संग संतांचा ॥१॥
चंद्रभागा वाळुवंट । आहे नीट देव उभा ॥२॥
पुंडलीक वेणुनाद । होतो आनंद अखंड ॥३॥
पद्मतळें गोपाळपुर । संत भार आहे तेथे ॥४॥
वैष्णवांचा गजर मोठा । आषाढी चोहटा नाचती ॥५॥
जाऊ तेथे लोटांगणी । फिटेल आयणीं गर्भवास ॥६॥
भाळे भोळे येती भक्त । आनंदे नाचत वाळुवंटी ॥७॥
लोंटागण घालूं चरणी । शरण एका जनार्दनी ॥८॥
