अवचित परवडी जालिये अ
929.
अवचित परवडी जालिये अंबुलिया ।
लाजिले आपुलिया सकळ गोता ॥१॥
एकांतीचे सुख भोगी आपुलिया सरिसी ।
दोहींची सरसी गती झाली ॥२॥
बापरखुमादेविवर विठ्ठला लाधला ।
मज घेउनी गेला बाईये वो ॥३॥
अर्थ :
एक गौळण म्हणते आत्मतत्त्वरूप श्रीकृष्णाची गाठ एकाएकी पडल्यामुळे मला सर्व आप्तेष्टांची लाज वाटली. मी याच्याबरोबर एकांतात आत्मसुख भोगीत
असतांना मी माझेपणाला विसरून गेले. माझे पिता व रखुमाईचा पती जे श्रीविठ्ठलरूप आत्मतत्त्वाची गाठ असल्यामुळे ते माझ्या ठिकाणचा माझेपणाच घेऊन गेले असे माऊली सांगतात.
