वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ११, बुद्धी रुपी सखिशी संवाद अभंग ८२१ ते ८३४

सखी सांगे सार शांति

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074288 · अभंग क्र. ८२७

827.
सखी सांगे सार शांति क्षमा दया ।
प्रपंच विलया बरळ पोशी ॥१॥
सखी म्हणे एका दुजी म्हणे अनेका ।
अनेकी सम्यका गुरुगम्य ॥२॥
सावध निबंध आद्याचा उकल ।
रसनेचालपालन रसना तोये ॥३॥
ज्ञानदेव सांगे रखुमादेवी जप ।
अगम्य संकल्प एक दिसे ॥४॥

अर्थ :
एक सखी, दुसरीस सांगते हा सर्व प्रपंच असार असून त्यामध्ये सार जर काय असेल तर शांति क्षमा दया ह्या होत. त्या सोडून नाशवंत प्रपंचाचे आपण वेड्यांसारखे फुकट पोषण करतो. जे परमात्मतत्त्व प्राप्त होणार ते तत्त्व एकच आहे. अशी एक सखी म्हणते तर दुसरी म्हणते. अनेक तत्त्व आहेत पहिली म्हणते अग त्या अनेक तत्त्वांमध्ये एकच परमतत्त्व कसे आहे. असे विचारशील तर ते गुरुगम्य आहे. म्हणजे गुरुपासूनच समजून घेतले पाहिजे. समजून घेतेवेळी सावधान चित्त असून त्याला प्रतिबंध कोणताही असू नये. अशा स्थितीत आपण तत्त्वांचा उलगडा करुन घ्यावा. त्याची चव बुद्धिरुपी रसनेनेच घेतली पाहिजे. अगम्य प्राप्तीचा मनांत संकल्प धरुन त्याच्या नामाचा जप केला असता त्याची प्रतिती होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग