वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ११, बुद्धी रुपी सखिशी संवाद अभंग ८२१ ते ८३४

सखीप्रती सखी आदरे कर

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074287 · अभंग क्र. ८२६

826.
सखीप्रती सखी आदरे करी प्रश्न ।
जीव शिव पूर्ण कैसा दिसे ॥१॥
सखी सांगे मात उभयता ब्रह्म ।
नाही हो विषम हरीवीण ॥२॥
सूर्यप्रकाश मही घटमठी समता ।
तैसा हा उभयता बिंब एका ॥३॥
बापरखुमादेविवरू विठ्ठल जीवाचा ।
व्यापक शिवाचा शिवपणे ॥४॥

अर्थ :
एक सखी, आपल्या मैत्रिणीस आदराने विचारते. का ग जीव, पूर्ण शिव म्हणजे परमात्मा कसा दिसावा? मैत्रिण उत्तर देते की त्या दोन्ही दशा ब्रह्मरूपच आहेत हरिवांचून त्यामध्ये दुसरी विषमता काहीच नाही. ज्याप्रमाणे पृथ्वीवर घटांवर प्रकाश पाडणारा एकच सूर्य आहे. त्याप्रमाणे या देहामध्ये आत्मा एकच आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच जीवपणाने जीवांत व शिवपणाने शिवांत व्यापक आहते असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग