हरिहरांसी जे करिती भ
995.
हरिहरांसी जे करिती भेद । ते मतवादी जाण निषिद्ध ॥१॥ हरिहर एक तेथे नाही भेद । कासयासि वाद मूढ जनी ॥२॥ गोडीसी साखर साखरेस गोडी । निवाडितां अर्ध दुजी नोहे ॥३॥ एका जनार्दनी हरिहर म्हणता । मोक्ष सायुज्यता पायं पडे ॥४॥