॥ अभंग १५ ॥
15.
॥ अभंग १५ ॥
नामा ऐसे नाम तुझिया स्वरूपा ।
आवरण आरूपा कोण ठेवी ॥ १ ॥
तू गुह्य चैतन्य नित्य वस्तु जाण ।
रहित कारण स्वयंप्रकाश ॥ २ ॥
याही शब्दामाजी वाचा न लागे ।
मार्ग पै गा लागे निर्धारिता ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार आत्मया नामदेवा ।
चिद्रूप अवघा दिससी साच ॥ ४ ॥
