रामकृष्ण नामे ये दोन
119.
रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी ।
हृदय मंदिरी स्मरा कांरे ॥
आपुली आपण करा सोडवण ।
संसार बंधन तोडा वेगी ॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ।
हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ति रया ॥
अर्थ :
रामकृष्ण या दोन नामांचे नित्य स्मरण करुन आपली आपल्याला सोडवणूक करता येईल व संसार बंधनातून मुक्त होता येईल. हृदय मंदिरी श्रीमूर्तीचा जिव्हाळा असल्याने ध्यानात रामकृष्ण माळा जपतो असे माऊली सांगतात.
