वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 23. संत सोयराबाई › 1. संत सोयराबाई अभंग गाथा › १. संत सोयराबाई ६२ अभंग › १. संत सोयराबाई अभंग गाथा

चोखा बैसता समाधीसी ।

🙏 23. संत सोयराबाई · ABH-075585 · अभंग क्र. २२

22.
चोखा बैसता समाधीसी । निर्मळा आली पंढरीसी ॥१॥
पाहोनी आनंद सोहळा । म्हणे विठ्ठल दयाळा ॥२॥
चोखा मेळविला रूपी । माझी आता कोण गती ॥३॥
देव बैसोनी निकटी । निर्मळासी सांगे गोष्ठी ॥४॥
ऐसे देखोनिया नयनी । सोयरा मिठी घाली चरणी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग