प्रकरण :- ॥ ज्ञानेश्
336.
प्रकरण :- ॥ ज्ञानेश्वर स्तुती ॥
उघडोनी वेदार्थांचा ठेवा । केला तरणोपाय जीवा ॥१॥
ऐसा समर्थ ज्ञानदेव । तया चरणी ठेवा भाव ॥२॥
प्रत्यक्ष प्रचित लोचनी । अस्थि विरती जीवनी ॥३॥
पुढे सोन्याचा पिंपळ । ऐसी साक्ष असे अढळ ॥४॥
कर जोडोनिया दोन्ही । चोखा जातो लोटांगणी ॥५॥
