गोड नाम तुमचे देवा ।
495.
गोड नाम तुमचे देवा ।
गोड सेवा तुमची ते ॥१॥
गोड तुमची कीर्ति वाणी ।
गोड श्रवणी ऐकता ॥२॥
गोड तुमचे रुप दृष्टी ।
गोड पोटी प्रेम ते ॥३॥
गोड निळा तुमचे पायी ।
गोड डोयी ठेविता ॥४॥
495.
गोड नाम तुमचे देवा ।
गोड सेवा तुमची ते ॥१॥
गोड तुमची कीर्ति वाणी ।
गोड श्रवणी ऐकता ॥२॥
गोड तुमचे रुप दृष्टी ।
गोड पोटी प्रेम ते ॥३॥
गोड निळा तुमचे पायी ।
गोड डोयी ठेविता ॥४॥