अष्टोत्तरशे वेळ समाध
1079.
अष्टोत्तरशे वेळ समाधि निश्चळ | पूर्वी तुझे स्थळ वहनाखाली ॥१॥
उठविला नंदी शिवाचा ढवळा | उघडिली शिळा विवराची ॥२॥
आसन आणि धुनि मृगछालावर | पाहाती ऋषीश्वर वोसंडोनि ॥३॥
बा माझी समाधि पाहिली जुनाट | केवळ वैकुंठ गुह्यगोप्य ॥४॥
नामा म्हणे देवा पुरातन स्थान | ऐसे नारायणे दावियेले ॥५॥
