वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

निंदक तेही फळ घेती क

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076055 · अभंग क्र. ३९७

397.
निंदक तेही फळ घेती कर्तृत्वेसी ।
निंदिता संतांसी नानापरी ॥१॥
नसता अपराध संतजन निंदी ।
सहस्त्र गाई-वधी दोष थोडा ॥२॥
संतांसी मत्सर करी सर्व काळ ।
दोष ते सबळ आले अंगी ॥३॥
असले अपराध संता-अंगी घोर ।
तो बोलला अपार दोष होती ॥४॥
असता अपराध नये आणू मुखा ।
वदता त्रिदोखा पात्र झाले ॥५॥
एवढे अपराध थोर जरी जाले ।
भला जो बोले दोषी खरा ॥६॥
संतांचे महिमान न कळे कोणासी ।
म्हणोनि दोषासी नरोपाए ॥७॥
’बहेणि म्हणे असे दोषी तोचि नर ।
लटिके संतांवर घाली दोष ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग