वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 141. चोवीस नामांचा महिमा

येई गे केशवे मज तुझी

🙏 4. संत नामदेव · ABH-083560 · अभंग क्र. ६२१

621.
येई गे केशवे मज तुझी सवे | तुजविण नुगवे दिनू माये ॥१॥
तू माय जननी कांसवी कौसाळ | दिन बहुसाळ मज पावे ॥२॥
न मागे केवळ विषयाचे टवाळ | तू माझी कृपाळ विठ्ठल माय ॥३॥
वोळली गगनी केशव कामधेनु | लवता लोचनु स्फुरे बाह्या ॥४॥
वाजवील वाद्य गोपाळांची मांदी | आल्हाद गोविंदी नित्य माझा ॥५॥
नामा म्हणे केशव येई कामधेनु | तेणे माझी तनु तृप्त सदा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग