येई गे नारायणी अमृत
622.
येई गे नारायणी अमृत संजीवनी | चिंतिता निर्वाणी पावे वेगी ॥१॥
तू माझे जीवन नाम नारायण | नित्य अनुष्ठान तुझ्या नामे ॥२॥
बाह्य अभ्यंतरी तूंचि सर्वांठायी| तुजविण सृष्टि शून्य दिसे ॥३॥
चाल लवलाह्या कृपाळु तू माये | मज हे न साहे मोह जाळ ॥४॥
तुटेल बिरडे सुटतील गांठी | जंव तू जगजेठी येशील माये ॥५॥
नामा म्हणे धन्य तुझे नाम साचे | उच्चारिता वाचे निवती अंगे ॥६॥
