नाचती विनोंदे।
15.
नाचती विनोंदे।
क्रीडा करी त्यांच्या छंदे ॥१॥
गोवळ वांकुल्या दाविती।
आले वाचे ते बोलती ॥२॥
म्हणती चोरटया शिनळा।
दोघा बापांचिया बाळा ॥३॥
लटिकीया कपटिया कुचरा।
निर्बल नपूंसका निष्ठूरा ॥४॥
तोंडे वांकुडी पिचके डोळे।
तया माजी आवडी खेळे ॥५॥
निळा म्हणे विश्वासिया।
न वजे दुरि पासूनिया ॥६॥
