व्यापक ते नाम अनंत ब
2105.
व्यापक ते नाम अनंत ब्रह्माडी । मना सोंस सांडीं कल्पनेचा ॥१॥
कल्पनाविरहित नाम तूंचि गाये । सर्व पाहे विठ्ठला पायी ॥२॥
ठसावेल मूर्ति पाहता अनुभव । पांचांचा मग ठाव कैंचा तेथे ॥३॥
एका जनार्दनी संपुर्ण अवघा । भीमातीरी थडवा उभा असे ॥४॥
