वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

दुर्लभु रे दुर्लभु र

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074795 · अभंग क्र. २३३

233.
दुर्लभु रे दुर्लभु रे दुर्लभु ।
संसारु तुम्ही का नेणा ।
आहार निद्रेसाठी दवडिता माणुसपणा ॥
आड ना विहिरी बावी ना पोखरणी ।
सरिता ना सागर कल्पतर रानोरानी? ॥
बावो याची खूण ज्ञानदेव जाणे ।
तयाचे करणे हे आधिकची होणे ॥

अर्थ :
मनुष्य जन्म दुर्लभ आहे. तो नरदेह आहार निद्रेसाठी वाया का दवडत? आड, विहिर, पाय-या असलेली विहिर तळी, नदी समुद्र वगैरे पाण्याचा उपयोग न करता वाढणारे कल्पवृक्ष काय रानोमाळ येत असतात बीनकामाची झाडे वाटेल तसल्या वाईट जमीनीत देखील पावसांच्या पाण्याने वाढतात. अशी ही न्यायी ईश्वराचीच हे वर्म मला कळले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग