वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

आकाशाचे अंती प्रणवाच

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075117 · अभंग क्र. ४३४

434.
आकाशाचे अंती प्रणवाचे गुज ।
निरंजन बीज साधू भारती ॥१॥
सद्रूप चिद्रूप अद्वय एके कळा ।
संसारी वाहिला निर्विकार ॥२॥
प्रणवी बीज अणुरेणु आत ।
दशमद्वाराची मात अपूर्व बा रे ॥३॥
बापरखुमादेवी प्रणव निखिल ।
शब्दाचे पाल्हाळ प्रणवी रिघे ॥४॥

अर्थ :
योगाभ्यासी पुरूष सहस्रदळ कमळातील अर्धमात्रारूप आकाशात एक तेजोमय बिंदु पाहातात. ते ओंकाराचे बीज आहे. या बिंदूवर लक्ष्य ठेवन निरंजन बीज म्हणजे जे ब्रह्म त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करतात. सत्, चित्, अद्वय निर्विकार अशा ब्रह्माचा संसारात राहून लाभ करून घेतात. प्रणव बीज जे ब्रह्म ते अणूरेणुत भरलेले आहे. ही गोष्ट दशमद्वार जे ब्रह्मरंध त्या ठिकाणी चित्त ठेवल्याने योग्याला कळते हा त्या दशमद्वाराचा चमत्कार आहे. माझे पिता व रखुमाईपती श्री विठ्ठल हेच सर्वत्र एक प्रणवरूप ब्रह्मच असल्यामुळे वेदातील शब्द पाल्हाळही ब्रह्मस्वरूपच आहे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग