शून्यावरी शून्य पाहे
200.
शून्यावरी शून्य पाहे । तयावरी शून्य आहे ॥1॥
प्रथम शून्य रक्तवर्ण । त्याचे नांव अधःशून्य ॥2॥
उर्ध्वशून्य श्वेतवर्ण । मध्य शून्य शामवर्ण ॥3॥
महा शून्य वर्ण नीळ । त्यात स्वरुप केवळ ॥4॥
अनुहात घंटा श्रवणी । ऐकुनी विस्मय जाहाली जनी ॥5॥
