अनंत कोटी आमचे अपराध
6.
अनंत कोटी आमचे अपराध साहिले । तु आमची माउली पांडुरंगा ॥
तुज परत जिवलग नाही त्रिभुवनी । तु आमची जननी पांडुरंगा ॥
अनंत कोटी तुझ्या उपकाराच्या रासी । बापा रुसीकेसी पांडुरंगा ॥
बोधला म्हणे तुज काये होऊ उतराई । तू आमचा मायबाप तू पांडुरंगा ॥
