वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

निरंतर नाम जपे | पित

🙏 4. संत नामदेव · ABH-083720 · अभंग क्र. ५०९

509.
निरंतर नाम जपे | पिता प्रल्हादास कोपे |उदरा आला वैरिरुपे | म्हणवूनि घायी त्रासला ॥१॥
कोपे कोपला नरहरी | कवण तयाते सांवरी |खटखटा वाजती दांतोरी | दैत्यावरी उठावला ॥२॥
हांक देऊनि अवचिती | आंदोळली त्रिजगती |समुद्र पाणी उसळती | उलथो पाहाती गिरिवर ॥३॥
सिंहवदन प्रगटला | मर्गजू अवचिता उतटला |भेणे वासुकी मोवाळला | गजबजिला पाताळी ॥४॥
जैसा प्रळयकाळिचा मेघु | तसा गडगडिला वेगु |अरे मर्गजाच्या खांबी सवेगु | क्षणामाजी प्रगटला ॥५॥
केला भक्तांचा कुडावा | शिक लाविली दानवा |नामया स्वामी वोळंगावा | नरहरि विसांवा भक्तांचा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग