वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

अनंत म्हणती माझिया स

🙏 4. संत नामदेव · ABH-083114 · अभंग क्र. ३८२

382.
अनंत म्हणती माझिया स्वामीते |अनंत गुण त्यांते म्हणोनिया ॥१॥
पतितपावन म्हणती माझिया स्वामीते |उध्दरी पतिताते म्हणोनिया ॥२॥
विश्वंभर म्हणती माझिया स्वामीते |पोशितो विश्वाते म्हणोनिया ॥३॥
जगजीवन म्हणती माझिया स्वामीते |जीवन जगाते म्हणोनिया ॥४॥
ह्रषीकेश म्हणती माझिया स्वामीते |चाळी इंद्रियाते म्हणोनिया ॥५॥
नामा म्हणे केशव म्हणती स्वामीते |नासितो क्लेशाते म्हणोनिया ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग