नेणो काय पुर्वार्जित
864.
नेणो काय पुर्वार्जित ।
होते सुकृत निक्षेपिचे ॥१॥
तेंणे हाती धरोनिया ।
संती ठाया पावविलो ॥२॥
विटेवरी दाविले धन ।
होते पोटाळुन महर्षी ज्या ॥३॥
निळा म्हणे बैसला ध्यानी ।
ज्याचिये चिंतनी सदाशिव ॥४॥
864.
नेणो काय पुर्वार्जित ।
होते सुकृत निक्षेपिचे ॥१॥
तेंणे हाती धरोनिया ।
संती ठाया पावविलो ॥२॥
विटेवरी दाविले धन ।
होते पोटाळुन महर्षी ज्या ॥३॥
निळा म्हणे बैसला ध्यानी ।
ज्याचिये चिंतनी सदाशिव ॥४॥