वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

धन्य ते गोकुळ धन्य त

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076031 · अभंग क्र. ३८०

380.
धन्य ते गोकुळ धन्य ते गोपाळ ।
धन्य लोकपाळ पुण्यशीळ ॥१॥
धन्य तोचि देश धन्य तोचि वंश ।
जेथ हृषीकेश अवतरले ॥२॥
धन्य तेचि माता धन्य तोचि पिता ।
जन्म कृष्णनाथा ज्याचे कुशी ॥३॥
धन्य त्या गोपिका कृष्णी तन्मयता ।
धन्य ते सरिता कृष्ण पोहे ॥४॥
धन्य वृंदावन धन्य गोवर्धन ।
चारी नारायण गायी सदा ॥५॥
धन्य तो दिवस धन्य तोचि मास ।
जन्मला अविनाश कृष्णसखा ॥६॥
बहिणी म्हणे धन्य नरनारी बाळके ।
घेती कृष्णसुख सर्वकाळ ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग