बाटविले तुवा अवघे गो
381.
बाटविले तुवा अवघे गोकुळ ।
क्रिया हे आकळ तुझी देवा ॥१॥
ऐसा तू लाघवी क्रियानष्ट जाण ।
ब्रह्म तुज ऐसिया म्हनती जन ॥२॥
चोरटा खाणोरी देहाचा पाईक ।
शिंदळांचा नाईक क्रिया तुझी ॥३॥
निलाजिरे जिणे हेडसाविती नारी ।
न संडी हे खोडी तुझी देवा ॥४॥
संपादिसी मुखे झाकिसी अक्रिया ।
लटिके करिसी तया साक्षीभूत ॥५॥
बहेणि म्हणे हरि न कळे तुझी लीला ।
ऐसा तू गोपाळा अनाचरी ॥६॥
