क्षीरसागरांत अससी बै
9.
क्षीरसागरांत अससी बैसला । धांवोनी मजला भेटी देई ॥१॥
कैलासासी शीव पूजितसे तुजला । धांवोनी मजला भेटी देई ॥२॥
शेषावरी जरी अससी निजला । धांवोनी मजला भेटी देई ॥३॥
गहिंवरोनि नामा बाहात विठ्ठाला । धांवोनी मजला भेटी देई ॥४॥