वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

तांची विश्रांति ज्ञा

🙏 4. संत नामदेव · ABH-083717 · अभंग क्र. ५३५

535.
तांची विश्रांति ज्ञानियांचे गुज | मुक्तिचे हे बिज मोक्षदानी ॥१॥
कृष्ण विष्णु हरी मुकुंद मुरारी | अच्युता नरहरी नारायणा ॥२॥
गोवर्धनधर गोपी मनोहर | भक्त करुणाकर पांडुरंगा ॥३॥
तूंचि हे सकळ आदि मध्य अंती | निजसुख संपत्ति सज्जनांची ॥४॥
सकळ नारायण पातक भंजन | हरि जगज्जीवन परमानंद ॥५॥
तूंचि माझा श्रोता तूंचि माझा वक्ता | तूंचि देता घेता प्रेमसुख ॥६॥
नामदेव ऐसे नाम त्वा ठेविले | येणे अनुभविले प्रेमसुख ॥७॥
विष्णुदास नामा विनवी पुरुषोत्तमा | सोडवि भवभ्रमा पासोनिया ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग