सहा शास्त्र चारी वेद
768.
सहा शास्त्र चारी वेद । नामापासोनी प्रसिद्ध ॥१॥
ते नाम गाऊ सदा । रामकृष्ण हरि गोविंदा ॥२॥
कर्म धर्म पडता न्यून । ते सांग हरिचिंतनें ॥३॥
योग याग तप तीर्थ । नामेंविण अवघे व्यर्थ ॥४॥
गणिका मोक्ष पदा नेली । रामनामे उद्धरली ॥५॥
तारिले जड जीव । एका जनार्दनी दृढ भाव ॥६॥
