आले संन्यासी तापसी ।
152.
आले संन्यासी तापसी ।
योगी मुनिजन प्रांतवासी ।
पंडित पुराणिक ज्योतिषी ।
वेदाभ्यासी याज्ञिक ॥१॥
श्स्त्रपाणि रिक्तपाणी ।
पहाति कृष्णाते ते दुरुनी ।
अवलोकूनिया निज नयनी ।
परम विस्मयाते पावती ॥२॥
घरे सांडूनिया नारी ।
आल्या कोणीचि नसता घरी ।
म्हणती सवेचि जाईल गे श्रीहरी ।
आम्ही त्या दृष्टी न देखता ॥३॥
मग जे उव्दिग्न व्हावे मनी ।
ते आतांच का न यावे पाहोनी ।
ऐशिया निश्रचयाते करुनी ।
आलिया एकांतवासीहि त्या ॥४॥
जिया बाहेरी येणेचि नाही ।
आपुलिया सभाग्यपणे कदाही ।
आल्या धावोनिया त्याही ।
कृष्णा दृष्टी अवलोकूं ॥५॥
निळा म्हणे घरा भाग्य ।
आलिया अव्हेरी कोण त्या मग ।
अधिकाअधीक लाहो सवेग ।
करुनिया संग्रहिती ॥६॥
