रक्तवर्ण स्थूळ श्वेत
425.
रक्तवर्ण स्थूळ श्वेत हे सूक्ष्म ।
कारण ते शाम ऐसे देखा ॥१॥
निळावर्ण देह महाकारण साजिरा ।
ज्योतीचा मोहरा अलक्ष लक्ष्मी ॥२॥
ज्ञानदेव म्हणे सर्व हे चैतन्य ।
मन हेचि धन्य धन्याचेनी ॥३॥
अर्थ :
स्थुल देह ही तांबडी पाकळी, सूक्ष्म देह पांढरी पाकळी, कारण देह काळी पाकळी. व महाकारण देहरूप पाकळीचा रंग निळा असतो. त्यामध्ये बह्मज्योतीरूप लक्ष्मी असते. हे दृश्य पदार्थ चैतन्यरूप आहे. सदगुरू धन्याच्या कृपेने ज्याच्या मनाला हे चैतन्य दिसते तो पुरूष धन्य धन्य होय असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
