परपुरूषाचे काय सांगो
416.
परपुरूषाचे काय सांगो सुख ।
हरे सर्व दुःख संसाराचे ॥१॥
म्हणानिया संग धरावा तयाचा ।
सकळ सुखाचा सुखदाता ॥२॥
परपुरूषाचे देखता चरण ।
उपरमे मन सुखावोनी ॥३॥
परपुरूषाचे देखता स्वरूप ।
कोटी सूर्यदीप हारपती ॥४॥
परपुरूषाचे सुख लाहे जरी ।
उतरोनी करी सीस घ्यावे ॥५॥
बहेणि म्हणे कोण न कळे पुण्य केले ।
सुख हे लाधले परपुरूषाचे ॥६॥
