वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

मायबापांपरीस लोभ तुझ

🙏 4. संत नामदेव · ABH-082629 · अभंग क्र. १७५७

1757.
मायबापांपरीस लोभ तुझा हरी | आहे मजवरी केशिराजा ॥१॥
आता जाणसी ते कृपाळुवा करी | लाज सर्व हरी आहे तुज ॥२॥
माझे जातिकुळ नाही त्वा पुशिले | अन्याय साहिले कोटथानकोटी ॥३॥
जन्मोजन्मी मज घातले पाठिसी | संकटी रक्षिसी नारायणा ॥४॥
देऊनि प्रेमभाते पाळिले मे माते | साउली तळहाते केली देवा ॥५॥
हे खूण जाणती तेचि माझे सखे | मी तुझे लाडिक म्हणवी देवा ॥६॥
नामा म्हणे काई होऊनी उतराई | पुढे जन्म नाही ऐसे केले ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग