वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › १. सार्थ अभंग १ ते ५००

वाघाचा कलभूत दिसे वा

🙏 3. संत तुकाराम · ABH-077601 · अभंग क्र. २२२

222.
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परी नाही दशा साच अंगी ॥१॥
बाहेरील रंग निवडी कसोटी । संघष्टणे भेटी आपेआप ॥धृपद॥
सिकविले तैसे नाचावे माकडे । न चले त्यापुढे युक्ति काही ॥२॥
तुका म्हणे करी लटिक्याचा साटा । फजित तो खोटा शीघ्र होय ॥३॥

अर्थ :
वाघाचे नुसते कातडे घेऊन त्या मध्ये भुसा भरून उभे केले तर ते खरे वाटते पण वाघाच्या अंगी जे काही गुण असते ते त्या ठिकाणी नसते. मुलाम्यचे नाणे कसोटीला लावले म्हणजे त्याचा खरा रंग दिसतो म्हणजे एखाद्याचे जास्त संबंध झाले तर त्याचा स्वभाव लक्षात येतो. ज्या प्रमाणे माकडाला शिकविले तर त्याला तेवढेच नाचणे खेळ करणे तेवढेच त्याला येते पण त्या पुढे त्याला स्वतःच्या बुद्धीने काही जमत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांनी खोट्याचा साठा केला आहे अश्यांची फजिती हि प्रसंगी होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग