औटपीठी तेज गुजगुजीत
417.
औटपीठी तेज गुजगुजीत ।
चारी देह तेथ साक्ष पाहा ॥१॥
अवस्था हे चारी संयोगचि एक ।
शुन्य जे निःशंक आत्मज्योती ॥२॥
ज्ञानदेवा बाई निवृत्ति वदविता ।
त्याचे चरणी हिताहित झाले ॥३॥
अर्थ :
औटपीठाच्या ठिकाणी मोहक असे तेज असते. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे चारी देह त्याठिकाणी केवळ ज्ञेयरूप आहेत. त्याठिकाणी
जागृती स्वप्न, सुषुप्ती व तूर्या या चार अवस्थांचा जणू काय संयोग होतो. त्या प्रमाणे चार देहाच्या पलीकडे निःसंशय आत्मज्योतीच आहे. ज्ञानोबाराय हे स्त्री
भूमिका पत्करून जे निवृत्तीराय मजकडून हे बोलवितात. त्याचे चरणीच अहिताचे हित झाले ग बाई. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
