(वाममार्गी शाक्तांचा
3461.
(वाममार्गी शाक्तांचा निषेध शाक्ता वरील अभंग)
ऐका कलीचे हे फळ । पुढे होईल ब्रम्हघोळ ॥१॥
चारी वर्ण अठरा याती । भोजन करिती एके पंक्ती ॥धृपद॥
पूजितीअसुरा रांडा । मद्य प्राशितील पेंढा ॥२॥
वामकवळ मार्जन । जन जाईल अध:पतन ॥३॥
तुका हरीभक्ती करी । शक्ती पाणी वाहे घरी ॥४॥
अर्थ :
कलिचे पुढील फळ ऐका पुढे चालून वर्णसंकरन होईल. चार वर्ण व अठरा जात एकत्र बसून एका पंक्तीत भोजन करतील. नीच जातीतील स्त्रीयांची लोक पूजा करतील व त्याचे उष्टे मद्य सेवन करतील. डाव्या हाताने जेवण करतील त्यामुळे लोक अध:पतनाला जातील. तुकाराम महाराज म्हणतात, अरे शाक्त उपासकांनो मूर्खांनो शुध्द अंत:करणाने हरीभक्ती करा शक्ती तुमच्या घरी पाणी वाहील.
