हेचि परमार्थाचे सार
1072.
हेचि परमार्थाचे सार ।
हरीचिया उच्चार नामाचा ॥१॥
जिही केला पावले ते ।
वैकुंठी सरते सुखी झाले ॥२॥
गाता वानिता हरि गुणरासी ।
झाले त्रैलोक्यासी पूज्य ते ॥३॥
निळा म्हणे निका उपावो ।
सापडला ठावो वैष्णवा ॥४॥
1072.
हेचि परमार्थाचे सार ।
हरीचिया उच्चार नामाचा ॥१॥
जिही केला पावले ते ।
वैकुंठी सरते सुखी झाले ॥२॥
गाता वानिता हरि गुणरासी ।
झाले त्रैलोक्यासी पूज्य ते ॥३॥
निळा म्हणे निका उपावो ।
सापडला ठावो वैष्णवा ॥४॥