मंडळ कमळ शुध्द पराग
3929.
मंडळ कमळ शुध्द पराग हेचिं मुखज्याचें वो । ओहं सोहं कोहं वाचे वदती अज्ञानपणत्याचे वो । परा आणि पश्यंती मध्यमा वैखरी सदानाचे वो । तेचि विटेवरी अंबा उभी राहीली असे वो ॥१॥ जय जय जगदंबे माऊली वो । जयजयजगदंबे माऊली वो ॥धृ.॥ गोजिरे रुप सुंदर उभीभीमातीरीं वो । चतुर्भुजा शोभती शंख चक्र मिरवेकरीं वो । कांसे पीतांबर वैजयंती मिरवे हृदयावरीवो । पुंडलिकाकारणे तिष्ठे अठ्ठावीस युगे विटेवरीवो ॥२॥ चरण रजालागी वंदीत ब्रह्मादिक जाहलेपिसे वो । विश्व विश्वाकार जनी जनार्दन भासे वो । अष्टभुजा नटली भक्ताकारणे विटेवरी असे वो । एकाजर्नादनी आम्हा अनायासें दिसे वो ॥३॥
