देखोनी आंधळे का बा ज
28.
देखोनी आंधळे का बा जन होती । न कळे या गति मजलागी ॥१॥
एकाते मरता आपणचि देखती । तयासी रडती आपणचि ॥२॥
हा कैसा नवलाव न कळे यांचा भाव । कोण घाव डाव आम्हांलागी ॥३॥
अवघेचि मज नवलाची परी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥