मज नाही तुझ्या ज्ञान
232.
मज नाही तुझ्या ज्ञानाची ती चाड । घेता वाटे गोड नाम तुझे ॥१॥
नेणते लेंकरु आवडीचे तान्हे । बोलतो वचने आवडीने ॥२॥
भक्ती नेणे काही वैराग्य ते नाही । घातला विठाई भर तुज ॥३॥
तुका म्हणे नाचे निर्लज्ज होऊनी । नाही माजे मनी दुजा भाव ॥४॥
