येथील लाभ घडे ज्यासी
927.
येथील लाभ घडे ज्यासी ।
तो त्या सुखासी अधिकारी ॥१॥
जेथे वसती नारायण ।
लक्ष्मी आपण वैकुंठी ॥२॥
तेथेचि तोहि पावेल सत्य ।
भोगी अव्दैत निजसुखा ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हादिका ।
न लभेचि एका अभिमाने ॥४॥
927.
येथील लाभ घडे ज्यासी ।
तो त्या सुखासी अधिकारी ॥१॥
जेथे वसती नारायण ।
लक्ष्मी आपण वैकुंठी ॥२॥
तेथेचि तोहि पावेल सत्य ।
भोगी अव्दैत निजसुखा ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हादिका ।
न लभेचि एका अभिमाने ॥४॥