वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

शृंगारिक माझी नव्हती

🙏 3. संत तुकाराम · ABH-079027 · अभंग क्र. १३९५

1395.
शृंगारिक माझी नव्हती उत्तरे । आळवितो खरे अवस्थेच्या ॥१॥
न घलावा मधी कामाचा विलंब । तुम्ही तो स्वयंभ करुणामूर्ती ॥२॥
तुका म्हणे केले सन्मुख वदन । देखता चरण पोटाळीन ॥३॥

अर्थ :
देवा माझी बोलणे म्हणजे शृंगारिक नाही माझी अवस्था तशी झाली आहे त्यामुळे मी तुला आळवित आहे. देवा तुम्ही स्वयंभू करूणेची मूर्ती आहात. त्यामुळे माझ्या भेटीसाठी मध्ये कोणताही अडथळा करू नका. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमची वाट पाहत आहे तुमच्या भेटीच्या दिशेने बसलो, आता मला तुमची चरण दिसले की ते मी माझ्या हृदयाशी कवटीळीण.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग