आठविता नामे सुखची सं
853.
आठविता नामे सुखची संतुष्टी ।
लाभे लाभ कोटी सुकृताचा ॥१॥
म्हणऊनि हाचि घेऊनिया छंद ।
गातुसे गोविंद विठ्ठल हरी ॥२॥
ज्याचिया व्दैतबाध ।
अवघाचि उपाध माया भ्रांती ॥३॥
निळा म्हणे नित्य वैष्णवा साधन ।
हेचि अनुसभान दिवसराती ॥४॥
