राष्ट्र करी पाप राजा
565.
राष्ट्र करी पाप राजाने भोगावे | राजियाचे ते सर्व पुरोहिता ॥१॥
बोले धर्मशास्त्र जाणती सर्वही| परी ते कोणाही न कळे वर्म ॥२॥
शिष्ये केले पाप भोगावे गुरूनें| स्त्रीने केले घेणे पुरुषासी ॥३॥
नामा म्हणे जन मायेंत गुंतले | सेखी खाती झोले संसाराचे ॥४॥
