सुंदरु बाळपणाची बुंथ
506.
सुंदरु बाळपणाची बुंथी घेऊनी श्रीपती । सनकादिकां गाती तेथे कुंठित गे माय ॥१॥
ब्रह्मा वेडावले ते वेंडावलें । पुंडलिकाधीन झाले गे माय ॥२॥
इंद्र चंद्र गुरु उपरमोनी जया सुखा । तो वाळूवंटी देखा संतासवें गे माय ॥३॥
ऐसा नटधारी मनु सर्वांचे हरी । एका जनार्दनाचे करी उच्छिष्ट खाय ॥४॥
