॥ संत निर्मळा ॥
1.
॥ संत निर्मळा ॥
संत निर्मळा अभंग गाथा
अनाथांचा नाथ कृपावंत देवा । घडो तुमची सेवा अहर्निशी ॥१॥
अठ्ठाविस युगे विटेवरी उभा । वामभागी शोभा रखुमादेवी ॥२॥
पतित पावन गाजे ब्रीदावळी । पुरवावी आळी हीच माझी ॥३॥
उभा विटेवरी ठेवोनी चरण । म्हणतसे बहिण चोखियाची ॥४॥
