वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

काळा पुरुष तो हा गगन

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075108 · अभंग क्र. ३८०

380.
काळा पुरुष तो हा गगनांत जो नांदे ।
अनुभवाच्या भेदे भेदला जो ॥१॥
भेदून अभेद अभेदुनी भेद ।
सच्चिदानंद जेथ नाही ॥२॥
ज्ञानदेव म्हणे तेथे अक्षय राहिला ।
आत्मा म्या पाहिला या दृष्टीसी ॥३॥

अर्थ :
जो गगनांत भरून उरला आहे. तो हा काळा पुरूष म्हणजे ब्रह्म होय. याच बद्दलचा अनुभव निरनिराळ्या व्यक्तिचा निरनिराळा असल्यामुळे याच्या ठिकाणी भेद वाटतो. याच्या ठिकाणी भेद दिसत असला तरी अधिष्ठान रूपाने अभेद आहे. व अभेद असला तरी उपाधियोगाने पूर्ण भेद दिसतो. याला सच्चिदानंद म्हणणे देखील संभवत नाही. माझ्या ठिकाणी अक्षय असणारा आत्मा मी माझ्या दृष्टीने पाहिला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग