केशवापरते देव आणिक आ
1901.
केशवापरते देव आणिक आहेती | ऐसे श्रुति स्मृति बोलतील ॥१॥
तरी ते शब्द झणी कानी हो पडती | पाखांडी म्हणती सहावे ते ॥२॥
इंद्रियांसी तुम्ही करा रे जतन | भजावा निधान श्रीविठ्ठल ॥३॥
छेदावया शिर हस्त सहस्रांचे | जरि बहुतांचे उगारले ॥४॥
परि तूते नाम आन न देवाचे | केशव परते कैसे असे ब्रह्म ॥५॥
अंगे चतुरानना जालिया हो भेटी | तोही जरी गोष्टी ऐसी करी ॥६॥
परि तो चळला पोटी असे जाण | एकी दुजेपण दावी तरी ॥७॥
ब्रह्मकटाह एक उल्लंघो शके ऐसा | वर्तोनि दाही दिशा वर्ते जरी ॥८॥
केाव नव्हे तो होका अनारिमा | म्हणोनिया वासा पाहो नका ॥ ९ |
व्यसन भक्ति प्रौढी पुरुषार्थ पांचवा | जिवाचिया जिवा सेवा ना का ॥१०॥
सर्वांभूती आहे केशव परमात्मा | न विसंबावे वर्मा नामा म्हणे ॥११॥
