या विठोबा परते आन दै
1900.
या विठोबा परते आन दैवत म्हणती । ते शब्द नायकवती कानी माझ्या ॥१॥
पाखांडी म्हणती उगेंचि असावे । हा ब्रह्मकटाह करू शके न अनारिसा ॥२॥
तोहि जरी म्हणेल अहं-ब्रह्मास । तरी न पहावी वास येही नयनी ॥३॥
कोटि कोटी ब्रह्मांडे एक एक्या रोमी । व्यापोनिया व्योमी वर्ततसे ॥४॥
ऐसा माझा विठो सर्वा घटी सम । न संडावे वर्म नामा म्हणे ॥५॥
