वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 6. विश्वरुप - अभंग २० ते २२

घालुनी माया म्हणे नं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090386 · अभंग क्र. २२

22.
घालुनी माया म्हणे नंदराया । भजे यादव राया कायावाचा ॥१॥ संसारसुख भोगाल चिरकाळ । परब्रह्मा निर्मळ तया भजे ॥२॥ नंद म्हणे देव दूर आहे बापा । आम्हांसी तो सोपा कैसा होये ॥३॥ ऐकातांचि वचन काय करी नारायण । प्रगटरुप जाण दाखविले ॥४॥ शंख चक्र गदा पद्म ते हस्तकीं । मुगुट मस्तकी शोभायमान ॥५॥ ऐसा पाहता हरी आनंद पै झाला । एका जनार्दनी भेटला जीवेंभावें ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग