पुन्हा पेहरंब्याच्या
231.
पुन्हा पेहरंब्याच्या सुखे गे गाई हरिमुखे ।
वाजवुनी टाळी रंगीनाचोनी हरिखे ॥१॥
देईल तोचि पाने गे गौरवुनी माने ।
खोबरियाच्या वाटया माळा गळांची सुमने ॥२॥
उदार हा दानी गे लोकी त्रिभुवनी ।
तोचि ध्याई चित्ती आता करिल सुखा धणी ॥३॥
निळा म्हणे सर्व खेळी खेळा साक्षभूत ।
तोचि जंनी वनी सये नांदे हदयात ॥४॥
